कादंबरीला न्याय दिलाय- दिग्दर्शक केदार वैद्य – eNavakal
मनोरंजन

कादंबरीला न्याय दिलाय- दिग्दर्शक केदार वैद्य

नुकत्याच सुरू झालेल्या १६व्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘झिपर्‍या’ या मराठी सिनेमाने झाली. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बुटपॉलीश करणार्‍या मुलांच्या जीवनावर हा सिनेमा बेतलाय. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार वैद्य यांच्याशी केलेली ही बातचीत…
अरुण साधूंच्या कादंबरीवर ‘झिपर्‍या’ आधारलेला आहे. कादंबरीवरून सिनेमा बनवावा असं कसं सुचलं?
– बेसिकली मी या क्षेत्रातच नव्हतं. ९८पर्यंत तरी नव्हतोच. तेव्हा वाचनाची मला प्रचंड आवड होती. पण परिस्थितीमुळे पुस्तकं वाचायला मिळायची नाहीत. टीव्हीही नव्हता. वाचन हे एकमेव साधन होतं. त्यावेळी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. त्याने झिपर्‍या ही कादंबरी मला वाचायला दिली. मला ती इतकी आवडली की अनेकदा ती वाचली. १९९८ साली मी दिग्दर्शन सहाय्य करायला लागलो अन्  ८ ते ९ वर्षांत या क्षेत्राचे बारकावे शिकलो तेव्हा या कादंबरीवरची चित्रं डोळ्यांसमोर उभी राहायची. यावर सिनेमा बनवायचा. मग अश्विनी दरेकर आणि संदीप दरेकर हे निर्माते भेटले. त्यांनी खूप मदत केली. या सिनेमातला रेल्वेचा पार्ट चित्रीत करणं हे काम खर्चिक होतं. तो दाखवला नसता तर त्याला मजा आली नसती. कादंबरीला न्याय मिळाला नसता.
रेल्वेचे चित्रीकरण करताना अडचणी आल्या का?
– फारशा अडचणी आल्या नाहीत. पण आम्ही रेल्वे प्लॅटफॉमवरचं सगळं चित्रण खरंखुरं घेतलंय. पण तेथे अपघाताचे एक दृष्य होते तेथे मात्र आम्हाला स्पेशल इफेक्ट्सचा वापर करावा लागला आहे. स्टेशन्स खरीखुरी दाखवली आहेत. अडचणी फारशा आल्या नाहीत कारण रेल्वेचे ईपीआरओ नरेंद्र पाटील यांनी खूप मदत केली. ते स्वत: साहित्याचे दर्दी… त्यामुळे त्यांनी खूप मदत केली. त्यांनी माणसं अशी दिली की त्यामुळे काहीच अडचणी आल्या नाहीत. अनेकदा गर्दी जमायची, आवरता यायची नाही. या गर्दीमुळे अपघात होईल का अशी भीती वाटायची. ती एक अडचण होती, पण सुदैवाने असं काही झालं नाही.
‘झिपर्‍या’चे लेखक अरुण साधू यांच्याबद्दल काय सांगाल?
– एखाद्या मोठ्या फिल्म फेस्टीवलमध्ये सिनेमाचा गौरव व्हावा असं वाटत होतं. ते स्वप्न आता पूर्ण होतंय. याचवेळी नेमकी अरुण साधूंची आठवण येतेय. त्यांना ही संकल्पना खूप आवडली होती. आपल्या कादंबरीवर हुबेहूब सिनेमा बनतोय याचं त्यांना अप्रुप होतं. आम्ही त्यांना याबाबत भेटलोही होतो. त्यांनी आशीर्वाद दिला होता. त्यांनी पटकथा वाचली होती. तुला या सिनेमाचा गाभा कळलेला आहे असं ते त्यावेळी बोलले होते. आत्ता ते आपल्यात नाहीत याचं वाईट वाटतं. पण त्यांच्या कुटुंबीयांनी हा सिनेमा पाहिलाय. त्यांनाही तो खूप आवडला आहे.
‘अगंबाई अरेच्या’ सिनेमाचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक होतात… स्वतंत्र दिग्दर्शन करताना काय वाटलं?
– या सिनेमानंतर मी खूप मालिका केल्या. ‘कळत नकळत’, झी मराठीवरची ‘अनुबंध’, स्टार प्रवाहवरची ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘पुढचं पाऊल’.. आता सध्या ‘माझ्या नवर्‍याची बायको’ ही मालिका दिग्दर्शित करतोय.. हा दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी होता. पण तो मालिकांच्या दिग्दर्शनाचा होता. माझा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला तेव्हा रोमांचित झालो होतो. कारण सिनेमा म्हणजे दिग्दर्शकाचं व्हिजन असतं. ते पडद्यावर दिसत असतं. त्यामुळे मोठा अनुभव मिळालाय. या शिदोरीवर पुढे जाईन असं वाटतं.
 
महेश भट्ट यांचे सहाय्यक होतात… मग हिंदी सिनेमा बनवावासा वाटला नाही?
– मुळात मी प्रवाहाबरोबर वाहात जाणार्‍यांपैकी आहे. जे समोर येईल ते स्वीकारतो. म्हणजे खरं तर मी चुकून या क्षेत्रात आलो होतो. पण परिस्थितीनुसार मराठीच करावं की हिंदीच करावं असं करण्यासारखं नव्हतं. तो प्रवास आता इथपर्यंत येऊन ठेपलाय.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More
post-image
महाराष्ट्र

हवेली तालुक्यात अशीही अफवा, सिहगडच्या जंगलात कोरोना रुग्ण

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यात काही गावांमध्ये अशी अफवा पसरली की त्यामुळे ही गावे रात्रभर जागी राहिली. पुण्यातील रुग्णालयातून पळालेले ४-५ कोरोनाबाधित रुग्ण सिहगडच्या...
Read More