कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू – eNavakal
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतले आहे.
निहाल वासवानी (6) असे मयत मुलाचे नाव आहे. कांदिवली पश्चिमच्या महावीरनगरमध्ये वीणासंतूर इमारत आहे. या इमारतीमध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला. या इमारतीत हायड्रोक्लोरीक पार्किंग आहे. एक कार धुवून झाल्यानंतर इमारतीचा सुरक्षारक्षक ती गाडी हायड्रोक्लोरिक रॅम्पवरून चढवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तितक्यात तो रॅम्पच खाली कोसळला. त्यावेळी सोसायटीमधील काही मुले त्याठिकाणी खेळत होती. त्यात निहालचा देखील समावेश होता. हा रॅम्प कोसळला तेव्हा निहाल त्याखाली चिरडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. निहालला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासले आणि मयत घोषित केले, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
देश

पेट्रोल-डिझेल सलग तिसऱ्या दिवशी महागले

मुंबई – देशात लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी तर डिझेलच्या दरात १९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More