काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे कठीण – सलमान खुर्शीद – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे कठीण – सलमान खुर्शीद

कोलकाता- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत येणे कठीण असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. भाजपला 2019 च्या निवडणुकांमध्ये हरवायचे असेल तर काँग्रेसच्या सहयोगी पक्षांनी काही गोष्टींवर तडजोड करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी कोलकात्यात एका मुलाखतीत सांगितलेे.
भाजपला सत्तेतून घालवायचे असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक समविचारी पक्षाला आघाडी होणे गरजेचे वाटत असेल तर काही गोष्टींवर तडजोड करावीच लागेल, काँग्रेसही तडजोडीसाठी तयार आहे. मात्र सहयोगी पक्षांनी काँग्रेसला वेठीस धरण्याचा प्रयत्न करु नये. खुर्शीद यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकते का, असा प्रश्नावर विचारले असता खुर्शीद यांनी नकार दिला. सध्याच्या घडीला ही गोष्ट शक्य नाही. जर आम्हाला स्वबळावर सत्तेत यायचे असेल तर गेल्या 5 वर्षांमध्ये तशी विधायक कामे होणे गरजेचे होते. निवडणुकांच्या आधी काही काळ तुम्ही अचानक स्वबळावर लढून सत्तेत येण्याची भाषा कराल तर तसे होणे शक्य नाही. सध्या समविचारी पक्षांसोबत आघाडी करणे हे काँग्रेससमोरचे उद्दीष्ट असून सध्या त्यावर काम सुरु असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक

मुंब –  राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...
Read More