काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेत! उदयनराजेंची टीका – eNavakal
News महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेत! उदयनराजेंची टीका

पाटण – काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली. पाटणमधील मल्हारपेठेत शंभूराजे देसाई यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना-भाजपा महायुतीचीच सत्ता येणार, असा विश्वासही उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, विरोधकांच्या भाषणात आजही अहंकार दिसतो. महापुरुषांचे विचारही काँग्रेस विसरली. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर यांना पडला एवढंच नाही तर महात्मा गांधी यांचा विचारही काँग्रेसला जपता आला नाही, अशीही टीका उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी श्रीनिवास पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. काही जण म्हणतात तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मागणी करतात उमेदवारी मलाच हवी. त्यानंतर मी आरशात पाहणेच सोडून दिले असे म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील यांची खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे हे तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी त्यांचेही कौतुक केले. आम्ही विचारांनी एकत्र आलेली माणसे आहोत. त्यामुळे कायमस्वरुपी एकत्र राहू, आमच्या एकत्र येण्यामागे कोणताही स्वार्थ नाही असेही ते म्हणाले. स्वार्थापोटी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळेच 15 वर्षांत ते जनतेचे काहीही भले करू शकले नाही. त्यांचे विचारही वेगळे आहेत, ते स्वार्थापोटी एकत्र आल्याने त्यांची वाताहात झाली. हे दोन्ही पक्ष विचारांनी
बांधलेले नाहीत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More