काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब

20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये प्रचाराचा नारळ फुटणार

मुंबई – अखेर अनेक दिवसांच्या बैठकांनंतर आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणूक आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या कालच्या दिल्लीतील बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादी 20 जागा व काँग्रेस 20 जागा या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले. मित्र पक्षांसाठी 8 जागा सोडण्यात आल्या आहेत. जर एखादा मित्र पक्ष आघाडीत आला नाही, तर त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ‘बी’ देखील तयार झाला आहे. माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास शरद पवार यांनी होकार दिला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन वंचित आघाडी, माकप, शेकाप, सपा आणि कवाडे गट अशी ही देशातील महागठबंधनची महाराष्ट्रातील आघाडी आहे. काल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला. मोदींना हटविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या. असे अजित पवार यांनी राज ठाकरेंना सांगितले. पुढील तीन-चार दिवसांत मनसे आघाडीत येणार की नाही यावर निर्णय होईल.
जर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन वंचित आघाडी या ना त्या कारणाने या विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहे पडली तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ‘बी’ सुद्धा तयार करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी 26-22 जागा लढविणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली जाहीर प्रचार सभा 20 फेब्रुवारीला नांदेड येथे होणार आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. पुढची सभा राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या परळी वैजनाथ येथे होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही माहिती दिली.

अजित पवार यांनी सांगितले की, ते पुन्हा राज ठाकरेंना भेटून चर्चा करणार आहेत. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीबाबत बोलताना सांगितले की, प्रकाश आंबेडकरांना एका प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून हवा आहे. तो प्रस्ताव काँग्रेस-राष्ट्रवादीने तयार केला असून त्यावर लवकरच सह्या होतील. प्रकाश आंबेडकरांची मागणी आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा असंवैधानिक व घटनाबाह्य आहे. संघाची रितसर नोंदणी झालेली नाही. त्यामुळे जर केंद्रात काँग्रेस सरकार आले तर त्यांनी संघ असंवैधानिक असल्याची लोकसभेत घोषणा करावी व कायदेशीर कारवाई करावी. हाच प्रस्ताव त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सही करून हवा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बीडच्या 15 गावातील विदारक चित्र

बीड – जिल्ह्यातील वडवली तालुक्यात शेतकर्‍यांचे विदारक चित्र दिसत आहे. दोन महिन्यांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने पिके करपत चालली आहेत. त्यामुळे तालुक्यातील 15 गावातील...
Read More