गुजरातच्या निवडणुकीनंतरच काँग्रेसच्या अध्यक्षाची घोषणा – eNavakal
देश निवडणूक राजकीय

गुजरातच्या निवडणुकीनंतरच काँग्रेसच्या अध्यक्षाची घोषणा

नवी दिल्ली- काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड आता गुजरात निवडणुकीनंतरच होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतात की नाही याचे उत्तर गुजरातच्या निवडणुकीनंतर समजणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 16 डिसेंबरला मतदान होणार असून 19 डिसेंबरला मतमोजणी आणि नवीन अध्यक्षाची घोषणा होणार आहे. तर गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.
राहुल गांधींना कांग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे. त्यासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज 10 जनपथवर येथे सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याच बैठकीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समिीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांवर निश्चिती झाली. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरपासून अर्ज मिळण्यास सुरूवात होणार असून 4 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. 5 डिसेंबर अर्जांची चाचपणी केली जाईल. उमेदवारांन 11 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दिली असून 16 ला मतदान आणि 19 ला मतमोजणी होईल.
काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड करण्याचे काँगे्रसच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे एकमेव अर्ज दाखल झाल्यास मतदानाची वेळच येणार नाही. शिवाय मतदान झालेच तर राहुल गांधी कितीच्या फरकाने जिंकणार हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More