काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; महाराष्ट्राचा समावेश नाही – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; महाराष्ट्राचा समावेश नाही

नवी दिल्ली – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पाचवी उमेदवार यादी सोमवारी रात्री उशिरा जाहीर केली. 56 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. तसेच या 56 उमेदवारांसह आंध्रातील विधानसभेचे 132 उमेदवार आणि ओडिशा विधानसभेचे 36 उमेदवार घोषित करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक यांनी उमेदवार यादी जाहीर केली.

लोकसभेच्या 56 उमेदवारांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेश-3, आंध्र प्रदेश – 28, आसाम-5, ओडिशा-6, तेलंगणा-8, पश्‍चिम बंगाल- 11 आणि लक्षद्विपच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधून डॉली शर्मा, पश्‍चिम बंगालच्या जांगीपूरमधून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी, तर उत्तर प्रदेशच्या मेरठमधून ओमप्रकाश शर्मा यांच्या ऐवजी हरेंद्र अग्रवाल यांना तिकिट दिले आहे. गाजियाबादच्या उमेदवार डॉली शर्मा या माजी महापौर आहेत, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र भारद्वाज यांच्या कन्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More