काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! शिंदेंसह देवरा पुन्हा रिंगणात – eNavakal
News देश राजकीय

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! शिंदेंसह देवरा पुन्हा रिंगणात

नवी दिल्ली- काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज सायंकाळी आपली 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील 16 आणि महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, नाना पटोले, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि डॉ. नामदेव उसेंडी हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
काँग्रेसने याआधी उत्तर प्रदेशातील पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावांचा समावेश होता. आज उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीही काँग्रेसने जाहीर केली. यामध्ये नागपूरातून भाजपाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले याना उमेदवारी तर गडचिरोली-चिमूर या नक्षलवादी भागातून डॉ. नामदेव उसेंडी, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, सोलापूरातून सुशिलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून अभिनेते राज बब्बर यांना उमेदवारी देम्यात ाली आहे. तर बहराईचमधून भाजपाच्या बंडखोर सावित्रीबाई फुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More