कळंबोली खाडीत शेकडो  मृत मासांचा खच  – eNavakal
News महाराष्ट्र

कळंबोली खाडीत शेकडो  मृत मासांचा खच 

पनवेल – तळोजा औद्योगिक विभातील प्रदुषणाचा व कासाडी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आता नवीन प्रकरणे समोर येत आहेत. कळंबोली येथील खाडी पात्रात देखील आता मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे समोर येत आहे. आंबेत खाडीत शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आले. संपूर्ण पात्रात मृत माशांचा खच पडला होता.
येथील स्थानिक राजकीय व्यक्तीनी झटपट पैसा कमविण्याचे साधन म्हणून तळोजा औद्योगिक वसाहती व कळंबोली वसाहतील  ही विघातक विषारी रसायने सोडण्याची य़ेथील ठिकाणे बनविली आहेत. एका टँकरमागे तगडा पैसा मिळत असल्याने येथे रात्रीच्या वेळी सरास बाहेरून रसायनिक टँकर सोडण्याचे काम केले जात आहे. असे विषारी रासायनयुक्त पाणी खाडीत सोडल्याने त्याचा परिणाम माशांवर झाल्याचे समोर येत आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्या रासायनिक युक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता रासायनयुक्त पाणी थेट नदीत, खाडी पात्रात, नाले यांच्यामध्ये सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी कासाडी नदी पात्रात देखील मृत माशांचे खच पहावयास मिळाले होते. कासाडी नदीच्या पात्रात होणाऱ्या जल प्रदुषणाचा मोठा फटका  या ठिकाणी मासेमारी करुन उपजीविका चालवणा-या कोळी बांधवांना बसला होता. यावेळी शकडो मासे मृत झाल्याची घटना घडलेली होती. गेल्या कित्येक वर्षापासून तळोजा एम्आयडीसीच्या काही कारखान्यातुन छुप्या पध्दतीने कासाडी नदीत रासायनीक पाणी सोडले जात आहे. यावर वारंवार प्रदुषण मंडळाला तक्रारी करुन देखील योग्य  कारवाई केली जात नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात असल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More