कल्याण – ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणार असल्याची शक्यता आहे. कल्याण ते शीळ हा रस्ता सहापदरी करण्याचे आदेश त्यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याशिवाय धोकादायक अवस्थेतला कल्याण पूर्व -पश्चिमेस जोडणा-या पत्री पूलाच्या जागी नव्या पुलाचे काम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे वाहतूक प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.
