कल्याण डोंबिवलीत नाराज शिवसैनिक मनसैनिक होणार ? – eNavakal
News मुंबई

कल्याण डोंबिवलीत नाराज शिवसैनिक मनसैनिक होणार ?

डोंबिवली  –  कल्याण डोंबिवलीत महापौर पद निवडणुकीचे  तीव्र पडसाद उमटत असून शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी असून नाराज शिवसैनिक मनसेकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी जोरदार स्पर्धाहोती.डझनभर महिला नगरसेविकांची  नावे चर्चेत होती. परंतु या निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने काँग्रेस मधून स्वार्थासाठी सेनेत आलेल्या राणे समर्थक विश्वनाथ राणे यांच्या पत्नी विनिता राणे यांच्या, आणि गेले दोन दिवस शिवसेनेत सुरु असलेली धुसफुस व नाराजी सोमवारी उफाळून आली. कल्याण,डोंबिवली  कल्याण पूर्व मांडा टिटवाळा ,कल्याण ग्रामीण डोंबिवली पूर्व पश्चिम अशा सर्वच भागातील शिवसेना पदाधिकारी ,नगरसेवक ,महिला आघाडी युवासेना अशासर्वच शिवसैनिकांनी संताप व नाराजी व्यक्त करत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सामुदायिक राजीनामे देण्याची तयारी केली.काहींनी राजिनामे दिल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्या.रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व नाराज शिवसैनिक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कैफियत मांडून न्याय मागणार आहेत . अनेक वर्षे शिवसेनेसाठी झटून संघटना वाढिसाठी  रात्रीचा दिवस करणाऱ्या कोणालाही महापौरपद दिले तरी चालले असते पण हा निर्णय अन्यायकारक आहे अशी भावना व्यक्त करुनन्याय मागण्यासाठी ठाण्यास रवाना झाल्याचे समजते. शिवसैनिकांना विश्वासात न घेता जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी एकतर्फी अभिनव बँकेच्या निवडाणुकीत समर्थ पॕनलला पाठिंबा जाहीर केला व या पॕनलचा पूर्ण धुव्वा उडाला त्यामुळे शिवसेनेची नाहक बदनामी झाली असाही नाराज शिवसैनिकांचा आरोप आहे. यामुळे ही महापौर निवडणुक शिवसेनेला महाग पडणार आसे दिसते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More