कल्याणात मृताच्या कुटुंबियांकडून रूग्णालयाची तोडफोड, जमावाच्या हल्ल्यात वृत्तांकनासाठी गेलेला पत्रकार जखमी – eNavakal
गुन्हे मुंबई

कल्याणात मृताच्या कुटुंबियांकडून रूग्णालयाची तोडफोड, जमावाच्या हल्ल्यात वृत्तांकनासाठी गेलेला पत्रकार जखमी

कल्याण – कल्याण पश्चिमेकडील हॉली क्रोस रुग्णालयात रोहित भोईर या 22 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी घटनेचे वृतांकन करण्यासाठी गेलेला पत्रकार जमावाच्या हल्ल्यात सापडला. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
रोहित भोईर या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रोहितच्या मृत्यूचा ठपका डॉक्टरांवर ठेवत त्याच्या कुटुंबियांनी रूग्णालयात तोडफोड केली. याची माहिती पत्रकार केतन बेटावदकर यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतापलेल्या जमावाच्या हल्ल्यात केतनही सापडले. जमावाने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More