कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धा – eNavakal
क्रीडा मुंबई

कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धा

कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी कल्याण (पूर्व) येथील मेट्रो मॉल येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. जोशीज चेस अ‍ॅकॅडमी आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विजेत्यांना एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणमधील युवा बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुरुष व महिला या श्रेणीत पहिल्या दोन क्रमांकाची विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. ५५ वर्षांवरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंसाठीही पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके असून दिव्यांग तसेच अंध खेळाडूंसाठीही स्वतंत्र श्रेणी आणि पुरस्कार असणार आहे. स्पर्धेत विविध विभागांत एकूण ६५ पारितोषिके देण्यात येणार असून, ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटना, अखिल मराठी बुद्धिबळ संघटना आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांची मान्यता या स्पर्धेला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More