कल्याणचा लोकग्राम पूल आजपासून ‘बंद’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

कल्याणचा लोकग्राम पूल आजपासून ‘बंद’

कल्याण – कल्याण पूर्वेकडील सीएसएमटी दिशेकडील लोकग्राम पादचारी पूल आजपासून प्रवासी वापरासाठी बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव लोकग्राम पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कल्याण पूर्वेला जाण्यासाठी सीएसएमटी दिशेकडील हा एकमेव पूल असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कल्याण पूर्वेकडील लोकग्राम परिसरात जाण्यासाठी प्रवाशांनी कर्जत दिशेकडील स्कायवॉकचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. पूलबंदीमुळे प्रवासी गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांना सूचना देण्यासाठी पूलाजवळ आरपीएफ जवान तैनात करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More