कलियुगाचा महिमा आणि सामान्य माणूस – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

कलियुगाचा महिमा आणि सामान्य माणूस

अनेकवेळेला सामान्य माणसाच्या तोंडून असे उद्गार निघत असतात की कलियुग सुरू आहे. जो प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरच संकटे येतात. त्याचीच परीक्षा पाहिली जाते आणि जे सर्वप्रकारचा गैरकारभार पाहातात नीतीमत्तेला गुंडाळून ठेवतात. ते लोक मात्र ऐषोआरामात जीवन जगतात. कलियुगाचा हा महिमा किती विचित्र असू शकतो. याची काही उदाहरणे जेव्हा घडतात त्यावेळेला त्या सामान्य माणसाचा अशा समजुतींवर आणखी जास्त विश्वास बसतो. तशातले हे एक उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये एक जाहिरातीचे होर्डिंग कोसळून चार जणांचे बळी गेले. पुण्याच्या मार्केट रोड भागात सिग्नलला काही रिक्षा, दुचाकी आणि काही गाड्या उभ्या असताना ही भली मोठी होर्डिंगची चौकट कोसळली आणि रिक्षात बसलेले, दुचाकीवर असलेले अनेक लोक जखमी झाले. त्यातली एक घटना तर इतकी ह्रदय पिळवटणारी आहे की त्यातला एक रिक्षाचालक तीन दिवसापूर्वी आपल्या पत्नीचे निधन झाले म्हणून आळंदीला अस्थिविसर्जनासाठी गेला होता. परत येताना रिक्षामध्ये तो त्याची वृध्द आई आणि चार वर्षाची मुलगी हेही सोबत होते. त्यात ते तिघे जखमी झाले पण हा ठार झाला. ही घटना ऐकल्यानंतर कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. या घटनेतले पाच जण गंभीररित्या जखमी आहेत. पुण्यात बेकायदेशीर होर्डिंग काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि हे होर्डिंग काढताना ठेकेदाराने योग्य काळजी घेतली नाही. खाली मुळापासून हे होर्डिंग कापल्यामुळे ते कोसळले आणि अनेकांचे हकनाक बळी गेले. काळाचा महिमा म्हणतात तो हाच. कधी अंगावर झाड कोसळते कधी होर्डिंग्ज कोसळतात कधी खड्डे चुकवताना शेजारच्या टँकरखालीच पतीपत्नीचा मृत्यू होतो, असे चित्रविचित्र प्रकार घडत असताना त्यात सामान्य माणसाचाच बळी जातो. खरे तर कोणावरही असा प्रसंग येता कामा नये. परंतु त्यामध्ये दुर्दैवाने सामान्य माणूसच या सगळ्या घटनांचा सर्वात मोठा बळी ठरताना दिसून येतो.

केव्हा काय घडेल याचा नेम नाही
घटनांमधले हे वैचित्र्य बघितल्यानंतर आश्चर्यही वाटते आणि धक्काही बसतो. आपल्या कामानिमित्त नेहमीप्रमाणे निघालेले हे लोक सवयीप्रमाणे सिग्नलला थांबतात आणि त्याचवेळी नेमका हा लोखंडी फलक अंगावर कोसळतो. अशाप्रकारची घटना यापूर्वी कधीही घडलेली नसते आणि कधीकाळी घडेल अशी अपेक्षाही केलेली नसते. मरण हा प्रकार कोणालाही चुकलेला नाही किंवा मृत्यू हा कसा येईल हेही सांगता येत नाही. परंतु आजच्या आधुनिक काळाने मृत्यू घडण्याचे हे वेगवेगळे प्रकार पाहिल्यानंतर यात नेमका दोष कोणाचा आहे हे शोधणेदेखील कठीण होऊन बसते आणि शेवटी नाईलाजाने त्याचे खापर नियतीवर फोडून आपण मोकळे होत असतो. परंतु गेल्या पाच दहा वर्षातले हे चित्रविचित्र प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. थोडेसे दमल्याभागल्यानंतर काहीवेळ विश्रांतीसाठी बसावे तर झाडच अंगावर कोसळते. मोठ्या श्रध्देने तीर्थयात्रेला किंवा देवदर्शनासाठी जावे तर तिथेही चेंगराचेंगरी घडावी. किंवा सातत्याने वाढणारे रस्ते अपघात इतके भयानक स्वरूपाचे असतात की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी कोकणामध्ये एक आख्खी बस दरीत कोसळते आणि तीसजणांचे एकाचवेळी बळी जातात आणि त्यातला एकच जण मात्र आश्चर्यकारकरित्या जिवंत राहातो. अगदी गेल्या आठवड्यातच मालाडला एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये एका महिलेच्या कारखाली पाच सहा वर्षाचा चिमुरडा सापडतो आणि तो अंगावरून कार जाऊनही सुखरूप राहातो. हा व्हिडीओ पाहताना अक्षरश: अंगावर काटा उभा राहातो. पुण्यातच गेल्या आठवड्यात कालवा फुटण्याची घटना घडते आणि शेकडो लोकांच्या घरात अनपेक्षितपणे वाटेल तशी नासधूस होते. हे सगळे प्रकार विचित्रपणा सांगणारेच ठरतात. प्रचंड शहरीकरण त्यातून निर्माण झालेल्या शेकडो समस्या ताणतणाव आणि प्रत्येकाला लागलेली वेगाची घाई ही सगळी या चित्रविचित्र अपघातांची कारणे म्हणावी लागतात. सरकारकडून ज्या गोष्टींची सावधानता घेतली जाणे आवश्यक असते तिथे तर सगळा सावळा गोंधळ असतो. परिणामी सरकारवर अवलंबून राहाणे किंवा सरकारकडून आपल्या जीविताची किंवा सुरक्षिततेची हमी मिळवणे वेडेपणाचेच म्हणावे लागते. शोकांतिका एवढीच आहे की अतिशय परिश्रम करणारा आणि आज ना उद्या आपले आयुष्य पालटेल चांगले दिवस येतील अशा आशेवर जगत राहणारा सामान्य माणूसच त्यात भरडला जातो ही आज वस्तुस्थिती आहे.

चांगुलपणातला आत्मविश्वास
पुण्यातल्या या अपघाताने हीच गोष्ट पुन्हा अधोरेखित केली. जगण्यासाठी विविध मार्ग आपापल्या ताकदीवर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत राहातो. परंतु त्याचे हे मार्ग केव्हाही आणि कशाही पध्दतीने बंद होऊ शकतात. कितीही जिद्दीने एखादे शिखर सर करण्याचा प्रयत्न होत असला तरी हे दोर कापले जाऊ शकतात. आपला वेळ वाचावा किंवा कमीत कमी वेळात आणि कमीत कमी कष्टात आपल्याकडून अधिकाधिक गोष्टी घडाव्यात म्हणून अगदी स्वत:चे वाहन घेऊन वेगाने धावणार्‍यांपुढेसुध्दा अपघातांचे किंवा अशा संकटांचे स्पिडब्रेकर्स कसे उभे ठाकतील हेही सांगता येऊ शकत नाही. कालवा फुटण्याचा प्रकार बेजबाबदारपणांमुळेच घडला. पण त्याची ही जबाबदारी स्वीकारायला कोणी तयार नाही. घटना तर घडून जातात. ज्यांच्यावर हे प्रसंग येतात त्यांची काय अवस्था होते त्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणूनच कलियुगातला हा सगळा प्रकार प्रामाणिकपणे जगणार्‍या सामान्य माणसाचीच परीक्षा पाहाणारा वाटू शकतो. मात्र असे प्रसंग घडूनही त्याच सामान्य जनतेचा चांगुलपणावरचा विश्वास कायम राहातो. किंबहुना माणसाला आशावादी ठेवण्यासाठी आयुष्यात असलेला आत्मविश्वासही देत राहातो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More