‘कलंक’मध्ये रंगणार माधुरी-आलियात जुगलबंदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘कलंक’मध्ये रंगणार माधुरी-आलियात जुगलबंदी

मुबई – नृत्यामध्ये माधुरी दीक्षितला टक्कर देणं सोपं नाही. तिकडे फक्त ऐश्वर्या रायच हवी. तीच माधुरीला टक्करच नाही, तर ठोकरही देऊ शकते. इतर नट्यांसाठी हे काम सोपं नाही. पण…आलिया भट हिने मात्र माधुरीला टक्कर द्यायची पुरेपूर तयारी केलीय. करण जोहरच्या ‘कलंक’ या सिनेमात आलिया एका शास्त्रीय नृत्यात थेट माधुरीशी भिडणार आहे. म्हटलं जातंय की गेल्या वर्षभरापासून ती कथ्थक डान्स म्हणूनच शिकतेय. एवढंच नव्हे, तर माधुरीचे गुरू पंडीत बिरजू महाराज यांच्याकडूनच आलिया नृत्याचे धडे गिरवतेय. याच बिरजू महाराज यांनी माधुरीच्या ‘काहे छेड़े’ (देवदास, 2002) आणि ‘जगावे सारी रैना’ (डेढ़ इश्किया, 2014) या गाण्यांना नृत्य दिग्दर्शन दिलं आहे. ‘कलंक’ या सिनेमात वरूण धवन आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More