कर बुडवणार्‍यांची 3 महिन्यांंत चौकशी पूर्ण करा! हायकोर्टाचे आदेश – eNavakal
News मुंबई

कर बुडवणार्‍यांची 3 महिन्यांंत चौकशी पूर्ण करा! हायकोर्टाचे आदेश

मुंबई- टीएमटीच्या बस थांब्यावर जाहिराती झळकवून ठेकेदाराने पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या एसीबीच्या कार्यपध्दतीवर न्यायमूती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत तीन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करा, असा आदेशच लाच लुचपत विभागाला दिला.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण 470 बसथांबे असून त्यापैकी 55 टक्के बसथांब्यावर जाहिरातींचे फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र यापैकी केवळ अडीच टक्के बसथांब्यांचे शुल्क महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे, असा दावा करत आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांने ठाण्यातील बसस्टॉपवर लावलेल्या अनियमित जाहिरातींबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे मनपात चौकशी सुरू केली आहे. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ठाणे मनपातील अतिवरीष्ठ अधिकार्‍याने ठाणे पोलिसांतील अतिवरीष्ठ अधिकार्‍याशी फोनवर संपर्क साधला आणि याची चर्चा सध्या संपूर्ण महापालिकेत रंगत आहे, असा खळबळजनक आरोप केला. तर या प्रकरणाची चौकशी करणार्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने चौकशी सुरू असून ती पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठीनं एसीबीला याप्रकरणी तीन महिन्यांत प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More