कर्नाटक पोटनिवडणूक : १५ पैकी ६ जागांवर भाजपाचा विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

कर्नाटक पोटनिवडणूक : १५ पैकी ६ जागांवर भाजपाचा विजय

बंगळूरू – कर्नाटकात येडियुरप्पा सरकार राहणार की जाणार हे आज ठरणार आहे. १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निकालावरून कर्नाटकात बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकार तरल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या जाहीर झालेल्या सात जागांपैकी सहा जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. त्यामुळे येडीयुरप्पा सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे कर्नाटकसह मुंबईतही भाजपाचा जल्लोष सुरू झाला आहे. तर सातपैकी कॉंग्रेसला एका जागेवर विजय मिळाला असून जेडीएसला एकही जागा जिंकता आलेली नाही.

दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे. काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, ‘या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्विकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही.’

कर्नाटकात काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सरकार टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या ६ जागा भाजपाने जिंकल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई – राज्यातील 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत राज्यातील 58 लाख 35...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ६६१ रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने ६०० चा आकडा ओलांडत १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक ६६१ रुग्णांची...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकीय

धारावी कोरोनामुक्तसाठी राजकीय श्रेयवाद, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मुंबई – दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. मात्र त्यामुळे राज्यात आता नवा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

घोडे तबेल्यातून फरार झाल्यावर जाग येणार का? सिब्बलांचा थेट सवाल

नवी दिल्ली – राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय त्यांच्यासोबत काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

लॉकडाऊनआधीच पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी स्विकारला पदभार

पुणे – पुण्यात उद्या १३ जुलैपासून लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे. त्याआधीच पुण्यात नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्विकारला आहे. वाचा – धारावी...
Read More