कर्नाटकात कुमारस्वामी सरकार धोक्यात! काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता – eNavakal
News देश

कर्नाटकात कुमारस्वामी सरकार धोक्यात! काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता

बंगळुरू- कर्नाटकातील लोकसभेच्या 29 पैकी 28 जागा जिंकून भाजपाने कर्नाटकांतील काँग्रेस-जेडीएस सरकारला जबरदस्त हादरा दिला आहे. आधीच काँग्रेस आणि जेडीएसचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यात भांडण जुंपले आहे. त्यात मंत्रिपदे न मिळाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. काही आमदार काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्यावर नाराज आहेत. या नाराज काँग्रेस आमदारांचे नेतृत्व सदानंद गौडा करीत आहेत. लवकरच काँग्रेसचे काही आमदार फुटून भाजपात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकांतील कुमारस्वामी सरकार कुठच्याही दिवशी पडू शकते. याबाबतची चर्चा करण्यासाठी काही बंडखोर आमदारांनी सध्या धर्मस्थल येथील योगा आणि नैसर्गिक उपचार केंद्रात उपचार घेणार्‍या सिद्धरामय्या यांना भेटले. त्यामध्ये प्रताप गौडा पाटील, बी नारायणराव, बी नागेंद्र आणि बसना गौडा दड्डल यांचा समावेश होता. या सर्वांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबद्दल तक्रार केली. 32 जणांच्या मंत्रिमंडळात 37 आमदार असलेल्या जनता दल सेक्युलरचे 24 मंत्री आहेत. तर 78 आमदार असलेल्या काँग्रेसचे फक्त 13 मंत्री आहेत. त्यामुळे नाराजी आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, पी.व्ही.सिंधू, मेरी कोम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रेडी मिक्स सिमेंटच्या 12 प्लांटवर कारवाई! ठाणे पालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – ठाण्यातील बेकायदा रेडी मिक्स सिमेंट प्लांटविरोधात ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली असून 18 पैकी 12 प्लांटवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई...
Read More
post-image
News विदेश

कोरोना व्हायरसची जगभरात दहशत! चीनमध्ये 41 जणांचा मृत्यू

दिल्ली – कोरोना व्हायरसची जगभरात दहशत निर्माण झाली आहे. चीनमध्ये सुमारे 41 जणांचा या विषाणूजन्य संसर्गाने मृत्यू झाला आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवणारे निर्दोष

माणगाव- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीच्या मागे असलेला वाघ्याचा पुतळा हटवल्याच्या खटल्यात संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांची माणगाव सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर आणि श्री जोतिबा मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट (इमारत संरचना पाहणी) लवकर केली जाणार आहे. दोन्ही मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट स्ट्रक्टवेल...
Read More