कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर पुढील सुनावणी मंगळवारी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर पुढील सुनावणी मंगळवारी

नवी दिल्ली – कर्नाटक सरकार सध्या प्रचंड संकटात आहे. काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आणि विधानसभा अध्यक्षांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी मंगळवारपर्यंत विधानसभा उपसभापती रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आणि त्यांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय देऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या मंगळवारी याप्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आगामी चार दिवस कर्नाटकातील राजकीय स्थिती जैसे थे राहणार आहे.

आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दोन्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बंडखोर आमदारांचे वकील मुकूल रोहतगी यांनी विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून राजीनामे मंजूर करण्यात वेळ लावत असल्याचा दावा करत दहाही आमदारांचे राजीनामे मंजूर करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश द्या, अशी विनंती केली. तर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्यावतीने वकील अभिषेक मनू संघवी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या विशेष अधिकाराबाबत बोलत राजीनाम्याचे समाधानकारक कारण दिल्याशिवाय विधानसभा अध्यक्ष राजीनामे मंजूर करू शकत नसल्याचे म्हटले. तसेच आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतची याचिका आपल्याकडे आल्याने त्याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाकडे केली. त्यावर आमदारांचा राजीनामा आणि अपात्रतेसंबंधीच्या याचिकेवर मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. येत्या मंगळवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडून २ महिला जखमी

ठाणे – मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडल्याने २ महिला जखमी झाल्या आहेत. तर या मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More