कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक – eNavakal
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी या कारवाईबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. तसेच ज्यावेळी बेगना ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्यांच्यासह एक भाजपा आमदार असल्याचा दावाही कुमारस्वामी यांनी केला आहे.

कुमारस्वामी यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘एसआयटीने आयएमए घोटाळ्याप्रकरणी आज रोशन बेग यांना ताब्यात घेतले आहे. ज्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्यांच्यासह येडीयुरप्पा यांचे खासगी सचिव संतोष विमानतळावर उपस्थित होते, हे दोघेही मुंबईला रवाना होणार होते. संतोष त्यावेळी पळून गेला मात्र रोशन यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच भाजपा आमदार योगेश्वरदेखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.’ भाजपाचे माजीमंत्री बंगळुरूच्या बंडखोर आमदारांना पळून जाण्यास मदत करत आहेत. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. यावरून सिद्ध होते की, कॉंग्रेस-जेडीएसची युती तोडण्याचे काम भाजपाच करत आहे, असा आरोपही कुमारस्वामी यांनी लगावला आहे.

कुमारस्वामींनी केलेल्या आरोपांचे उत्तर देताना भाजपाने ‘विमानतळावर बेग यांच्यासह येडीयुरप्पा यांचे खासगी सचिव होते हे साफ खोटे आहे, असे म्हणत कुमारस्वामी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत’, अशी टीका केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More