कर्नाटकच्या लिंगायत मठाचा मुख्य पुरोहित मुस्लिम तरुण – eNavakal
देश

कर्नाटकच्या लिंगायत मठाचा मुख्य पुरोहित मुस्लिम तरुण

हुबळी – कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या एका मठात मुस्लिम युवकाला प्रमुख पुरोहितपदी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. शरीफ रहमानसाब मुल्ला असे या मुस्लिम युवकाचे नाव असून ते २६ फेब्रुवारी या दिवशी लिंगायत मठाच्या प्रमुख पुरोहितपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आसुती गावात असलेल्या मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतीधाम मठात शरीफ प्रमुख पुरोहित बनणार आहे. हा मठ खजुरी गावातील ३५० वर्षे पुरातन कोरानेश्वर संस्थान मठाशी संलग्न असून २-३ वर्षांपासून आसुती गावात कार्यरत आहे.

१२ व्या शतकातील महान समाजसुधारक बसवण्णा यांच्या शिकवणुकीने लहानपणापासूनच आपल्याला प्रभावित केल्याचे शरीफ सांगतात. ‘आपण बसवण्णांच्या सामाजिक न्याय आणि बंधुभावाच्या आदर्शांवरच काम करू’, असेही ते म्हणाले. त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी या मठासाठी २ एकर जमीनही दान केली होती.

तर खजुरी मठाचे पुजारी मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शिवयोगी यांनी याबाबत बोलताना म्हटले, ‘बसवण्णांनी १२ व्या शतकात सामाजिक न्याय आणि बंधुभावाचे स्वप्न पाहिले होते आणि त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करत आम्ही सर्वांसाठी मठाचे दरवाजे उघडले आहेत.’ तसेच शरीफ हा बसवण्णांच्या दर्शनाप्रती समर्पित असून त्यांच्या वडिलांनी लिंग दीक्षा घेतली होतीस असेही शिवयोगी यांनी सांगितले. १० नोव्हेंबर २०१९ मध्ये शरीफने दीक्षा घेतली. आम्ही गेली ३ वर्षे त्याला लिंगायत धर्म आणि बनवण्णांच्या शिकवणुकीच्या विविध पैलूंचे ज्ञान देऊन शिक्षित केले असल्याचेही ते म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य

नवी दिल्ली – भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार भारतीय उच्चायोगाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मालाडनंतर फोर्टमध्येही इमारतीचा भाग कोसळला, अनेकजण दबल्याची शक्यता

मुंबई – मालाडच्या मालवणी परिसरात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता पुन्हा फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.या इमारतीचं पूनर्बांधणीचं काम सुरू असल्याची...
Read More