कर्णधार विराट कोहली ठरला आकर्षणाचे प्रमुख केंद्र – eNavakal
क्रीडा देश

कर्णधार विराट कोहली ठरला आकर्षणाचे प्रमुख केंद्र

बंगळुरू – बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा मंगळवारी रात्री येथे संपन्न झाला. या सोहळ्यात अर्थातच आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरला. तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सलग दुसर्‍या वर्षी विराटला भारतातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार म्हणून विराटला पॉली उम्रीगर चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी भारताचे माजी कसोटीवीर अंशुमान गायकवाड आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सुधा शाहला सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या मानेला झालेल्या दुखापतीमधून विराट सावरत असून, आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी पूर्णपणे फिट होण्याचा तो प्रयत्न करत आहे. या पुरस्कार सोहळ्याला अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ देखील उपस्थित होता. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार केवीन पिटरसन यांनी मन्सुर अलीखान पतौडी व्याखान दिले. देशांर्गत क्रिकेट सामन्यात शानदार कामगिर करणार्‍या कृणाल पंड्या, परवेज रसूद आणि जलज सक्सेना यांच्यादेखील या पुरस्कारत देखील गौरव करण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More
post-image
News मुंबई

रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई-मध्य आणि हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 19 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून ते...
Read More