कर्णधार विराटचे शतक! बंगळुरूच्या 213 धावा – eNavakal
News क्रीडा देश

कर्णधार विराटचे शतक! बंगळुरूच्या 213 धावा

कोलकाता-आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू – कोलकाता लढतीत बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या दमदार शतकामुळे प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगळुरूने 20 षटकांत 4 बाद 213 धावांची मोठी मजल मारली. मोईन अलीने विराटला 66 धावांची तुफानी खेळी करून चांगली साथ दिली. या दोघांनी तिसर्‍याविकेटसाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केूली. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम बंगळुरूला फलंदाजी दिली. पण त्याचा हा निर्णय चांगलाच महागात पडला. कर्णधार विराट आणि मोईन अलीने केलेल्या फटकेबाजीमुळे बंगळुरूने 200 धावांचा टप्पा ओलांडला. त्यांची सुरुवात मात्र खराब झाली. सलामीवीर पटेल अवघ्या 11 धावा काढून नरिनचा शिकार ठरला. तर बढती देण्यात आलेल्या नाथ देखील अवघ्या 13 धावा काढून रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण 4 थ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोईन अलीने कर्णधार विराटला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी करून त्यांचा डाव सावरला. मोईन अलीने अवघ्या 28 चेंडूंत 5 चौकार आणि 6 षटकार मारून 66 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने कुलदीप यादवच्या 4 थ्या षटकांत तब्बल 27 धावा चोपल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्याच यादवने शेवटी अलीला 66 धावांवर त्याच षटकांत शेवटच्या चेंडूवर बाद करण्यात यश मिळविले. कर्णधार कोहलीने 20 व्या षटकांत आपले यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिले शतक साजरे केले.
57 चेंडू खेळताना त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. वेगवान गोलंदाज हॅरीला चौकार मारून त्याने आपले शतक पूर्ण केले. डावातील शेवटच्या चेंडूवर मात्र विराट बाद झाला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत शतक काढणारा विराट पाचवा फलंदाज ठरला. या अगोदर सॅमसन, वॉर्नर, बेअरस्टो, राहुल यांनीदेखील शतके काढली होती. बंगळुरूचा स्टार फलंदाज डिव्हीलिअर्सला या सामन्यात विश्रांती देण्यात आली. तर अनुभवी वेगवान गोलंदाज स्टेनने बर्‍याच मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा बंगळुरू संघात ‘कमबॅक’ केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More