कर्णधार रोहित शर्माने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखली – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

कर्णधार रोहित शर्माने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखली

पुणे – कर्णधार रोहित शर्माने काढलेल्या शानदार नाबाद अर्ध शतकी खेळीमुळे आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील चेन्नई विरुध्दच्या लढतीत मुंबई संघाला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखण्यात यश मिळाले. मुंबईने ही लढत 2 चेंडू आणि 8 गडी राखून आरामात जिंकली तसेच गेल्या सामन्यातील पराभवाची परतफेडदेखील केली. स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवून ‘प्ले ऑफ’च्या आशा मुंबईने कायम ठेवल्या आहेत.

विजयासाठी मुंबई समोर 170 धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर सुर्यकुमार यादव आणि लुईस यांचे बळी गमावून मुंबईने हे लक्ष्य सहज पार केले. यादव – लुईसने मुंबईला चांगली सलामी करून दिली. यादवने 44 तर लुईसने 47 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार रोहीत शर्माने शानदार फलंदाजी करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने अवघ्या 33 चेंडूत 6 चौेकार आणि 2 षटकार मारून नाबाद 56 धावा केल्या. सामन्यातील शार्दुल ठाकूरच्या 19 व्या षटकात रोहितने 19 धावा वसुल करून मुंबईचा विजय दृष्टीक्षेपात आणला. या स्पर्धेतील मुंबईचा हा दुसरा विजय होता. तर चेन्नईचा दुसरा पराभव होता.

तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या सुरेश रैनाने काढलेल्या नाबाद 75 धावांच्या जोरावर प्रघथम फलंदाजी करणार्‍या चैन्नई संघाने 20 षटकांत 5 बाद 169 धावांची मजल मारली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यांचा सलामीवीर वॅटसनला कृणाल पण्ड्याने 12 धावांवर बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर फॉर्मात असलेल्या रैना-रायडूने दुसर्‍या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करून त्यांचा डाव सावरला. अखेर रायडूला कृणाल पंड्यानेच 46 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्याने 35 चेंडू खेळताना 2 चौकार आणि 4 षटकार मारले. रायडूची जागा मग कर्णधार धोनीने घेतली. त्याने रैनासोबत तिसर्‍या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करून त्यांची स्थिती आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केला.

धोनीला मिचेलने 26 धावांवर बाद करून त्यांना मोठा धक्का दिला. त्याने 21 चेंडू खेळताना 3 चौकार आणि 1 षटकार मारला. नंतर आलेल्या ब्राव्होला मिचेलने भोपळादेखील फोडू दिला नाही. तर बिलिंगला पांड्याने 3 धावांवर माघारी पाठविले. एका बाजूने त्यांचे फलंदाज बाद होत असताना रैनाने त्यांची एकबाजू लावून धरली. त्याने 47 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकार मारून 75 धावांची नाबाद दमदार खेळी केली. मुंबईतर्फे मिचेल आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी 2 बळी घेतले. मुंबईने या सामन्यासाठी पोलार्ड आणि रेहमानला वगळून ड्युमिनी, कटिंग यांना संधी दिली. तर चेन्नईने आपला बंगळुरूविरुद्ध खेळलेलाच संघ कायम ठेवला. कर्णधार धोनीचा कर्णधार म्हणून आयपीएल स्पर्धेतील आजचा 150 वा सामना होता. मुंबईतर्फे बुमराहने चांगली गोलंदाजी करताना आपल्या 4 षटकांत सर्वात कमी 25 धावा दिल्या. तर कटिंगच्या एका षटकांत 14 धावा निघाल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More