कर्जमाफीवरून विधानसभेत गदारोळ;कामकाज दिवसभरासाठी तहकूब  – eNavakal
मंत्रालय महाराष्ट्र मुंबई

 कर्जमाफीवरून विधानसभेत गदारोळ;कामकाज दिवसभरासाठी तहकूब 

मुंबई –  विधानसभेमध्ये आज कमला मिल, कर्जमाफी अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावेळी कमला मिलमधील एकूण जमिनीच्या ३० टक्के जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करण्याचा नियम होता, मात्र आघाडी सरकारने विकास नियंत्रक नियमावली अर्थात बदल केला असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.त्यानंतर कर्जमाफी आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
तसेच कमला मिलची संपूर्ण जागा मालकाच्या घशात घालण्यात आली. कमला मिल प्रकरण हे आघाडी सरकारने केलेला घोटाळा आहे. याची चौकशी होईलच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कमला मिलबाबत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर कर्जमाफी  आणि धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी चर्चा सुरु असतानाच विरोधी पक्षांनी घोषणाबाजीस सुरुवात केली आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More