कर्जत-पनवेल रेल्वेलाईन ‘पाण्यात’; प्रवाशांचे हाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या

कर्जत-पनवेल रेल्वेलाईन ‘पाण्यात’; प्रवाशांचे हाल

कर्जत – मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची कर्जत ते कल्याण दरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. कर्जत स्थानकात रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. रुळांवर जवळपास १० ते ११ इंच पाणी साचल्याचे समोर येत आहे. अंबरनाथसह अन्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे. कर्जत रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रगती एक्सप्रेसची वाहतूक वळवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि रायगड या भागांना मुसळधार पावसाने झोडपले असून पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावरुन पळवण्यात आली आहे.

कर्जत-चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन वळवण्यात आली आहे. तर ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेस दौंड–मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर १२१२६ प्रगती एक्स्प्रेस आणि १७६१४ नांदेड–पनवेल एक्स्प्रेसही कर्जत–पनवेलऐवजी कर्जत–कल्याण मार्गावर वळवण्यात आली आहे. माथेरान–अमन लॉज दरम्यानही रुळावर झाड पडल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More