करुणानिधींच्या निधनाचा शोकप्रस्ताव मात्र मेजर कौस्तुभ राणेंचा पडला विसर – eNavakal
News मुंबई

करुणानिधींच्या निधनाचा शोकप्रस्ताव मात्र मेजर कौस्तुभ राणेंचा पडला विसर

मुंबई- बेस्ट समिती सदस्यांची सभेत तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रध्दांजली वाहण्यात आली. मात्र यावेळी समिती सदस्यांना जम्मू-काश्मिरातील गुरेज सेक्टर येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीर झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विसर पडल्याचे दिसून आले.
आज बेस्ट समितीची सभा इलेक्ट्रीक हाऊस येथे दुपारी 12 वाजता पार पडली. या सभेला अध्यक्ष आशिष चेंबुरकर, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, सदस्य सुहास सामंत, सुनिल गणाचार्य, रवि राजा, अनिल कोकीळ, राजेश कुसळे, श्रीकांत कवठणकर आदी उपस्थित होते. यावेळी सभेची सुरुवात तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथवेल करुणानिधी यांच्या दु:खद निधनाच्या प्रस्तावाने झाली. या प्रस्तावावर काँग्रसचे रवि राजा आणि भाजपाचे सुनिल गणाचार्य यांनी आपली भाषणे करत शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहण्यात आली. मात्र ही श्रध्दांजली वाहत असताना समिती सदस्यांना जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले महाराष्ट्राचे वीरसुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांचा विसर पडला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More
post-image
News देश

आरबीआयच्या निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती

नवी दिल्ली- उर्जित पटेल आरबीआयला वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आपली कातडी वाचवण्यासाठी आरबीआयच्या राखीव निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती असल्याचे...
Read More