करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ – eNavakal
News महाराष्ट्र

करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ

करमाळा – करमाळा तालुक्यात दुष्काळाने रौद्ररूप धारण केले असून ग्रामीण भागात पाणी पुर्णपणे आटले आहे. 47 गावांना 51 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी वाढत आहे. दुष्काळाची दाहकता वाढली आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
करमाळा तालुक्याचे विस्तृत क्षेत्र पाहता प्रशासनाकडून झालेल्या उपाययोजनाही तोकड्या पडत असल्याचे जाणवत आहे. 85 गावांत भयावह स्थिती तालुक्यातील 118 पैकी 85 गावांत दुष्काळाची स्थिती भयावह आहे. प्रशासनाकडून यावर मात करण्यासाठी कंबर कसली असली तरी या नैसर्गिक संकटापुढे त्यांची ताकद तोकडी पडताना दिसत आहे. तालुक्यातील पोथरेसह अनेक गावांतील लिंबूच्या बागा पाण्याअभावी जळाल्या आहेत. यामुळे लिंबू उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
विहिरी, विंधन विहिरी आटल्या करमाळा तालुक्यातील 118 गावे व वाड्यावस्त्यांसह बहुतेक सर्वच ठिकाणी दुष्काळाचे भयाण चटके बसू लागले आहेत. तालुक्यातील बहुतेक सर्वच विहिरी कोरड्या पडल्या असून विंधन विहिरीही बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या टँकरवरच सर्वसामान्यांना आता विसंबून रहावे लागत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या आसांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More