करचुकवेगिरीचे आरोप झालेल्या सनबर्नच्याआयोजकांना परवानगी कशी? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला परखड सवाल – eNavakal
न्यायालय मुंबई

करचुकवेगिरीचे आरोप झालेल्या सनबर्नच्याआयोजकांना परवानगी कशी? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला परखड सवाल

पुणे – बावधनमध्ये सनबर्न फेस्टिव्हल नको म्हणून स्थानिकांचा विरोध दर्शवत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सुनावणीवर सोमवारी सुनावणी पार पडली असून सनबर्नमध्ये लाखोंच्या गर्दीत किशोरवयीन मुलामुलींना मद्य पिण्यापासून कसं रोखणार? आणि करचुकवेगिरीचे आरोप झालेल्या सनबर्नच्या आयोजकांना परवानगी कशी? असे हायकोर्टाने परखड सवाल राज्य सरकारला विचारले आहेत. पुण्यातील सनबर्नफेस्टिवलच्या आयोजनाविरोधात हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती.
लवळे येथील परसेट लाईव्ह आयोजित सनबर्न फेस्टिव्हलला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले होते. सभेनंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारी चालू असलेली सर्व कामे बंद पाडली होती. बळजबरीने हा कार्यक्रम घेतल्यास आत्मदहनाचा व आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी या सभेत दिला आहेे. बावधन व लवळे गावच्या सीमेवर ऑक्सफर्ड गोल्फ रिसॅार्ट परिसरात गुरुवार दिनांक 28 ते रविवार दिनांक 31 डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्कृतीचा र्‍हास करणारा हा कार्यक्रम होऊच नये, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

इंटरनेट रेडिओ सुरू करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका

नवी मुंबई – कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध माध्यमांचा वापर केला असून आता यामध्ये इंटरनेट रेडिओ या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला...
Read More
post-image
देश

‘हल्दीराम भुजियावाला’चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन

नवी दिल्ली – शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले....
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणेकरांची चिंता वाढली 18 नवीन रुग्ण आढळले

पुणे – देशात कोरोनाबाधितांचा आकडा रोज फुगत चालला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. पुण्यात काल 18 नवीन रुग्णांची भर पडली...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरानाच्या रुग्णांसाठी रेल्वेतर्फे ५० आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड

पुणे – राज्यातील दुसरे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात रेल्वेमार्फत ‘आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड’ तयार करण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात ५० कोच पुरविण्यात येणार आहेत....
Read More