कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक – eNavakal
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या प्रकरणात सूरत येथून ६ जणांना अटक केली आहे. कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणात बिजनोर येथील दोन मौलानांवर हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली लखनऊ येथे प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाना मुफ्ती नईम काजमी आणि इमाम मौलाना अनावारुल हक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मौलानांची नावे आहेत. यापैकी मौलाना अनावारुल यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. २०१५ साली या दोन्ही मौलानांनी कमलेश तिवारी यांचे शिरच्छेद करणाऱ्याला १.५ कोटींचे बक्षीस देणार, असे जाहीर केले होते. कमलेश तिवारी यांच्या पत्नीने या प्रकरणात नाका हिंडोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कमलेश तिवारी यांची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडून आणि चाकूचे वार करून दिवसाढवळ्या त्यांना ठार करण्यात आले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हा प्रकार घडला. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सत्तास्थापनेबाबत उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार सत्तेत येईल’, असा विश्वास व्यक्त केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

शरद पवार आज मोदींना भेटणार! समीकरणे बदलणार?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसद भवनात आज दुपारी १२.४० वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘अपनों के विघ्नों ने घेरा’ – संजय राऊत

मुंबई – दररोज ट्विट आणि पत्रकार परिषदेतून भाजपावर तोफ डागणारे संजय राऊत यांनी आज ‘अपनों के विघ्नों ने घेरा’ असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. आज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More