कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांचे आज पासून मंत्रालयासमोर आंदोलन – eNavakal
आंदोलन मुंबई

कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांचे आज पासून मंत्रालयासमोर आंदोलन

मुंबई – आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी आत्ता थेट मंत्रालयाचे दार ठोठावले आहे. आजपासून कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षक मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक संघटनेने बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते. त्यानंतर ह्या शिक्षक संघटनांना अधिवेशन काळात योग्य तो निर्णय घेतला जाईल अश्या आश्वासनानंतर संबंधित आंदोलन मागे घेतले होते.  व तसे निवेदन शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात व प्रसिद्धी माध्यमांकडेही केले होते.

तरीही 21 मार्चला अर्थमंत्री, शिक्षणमंत्री व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत मागण्यांवर शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. म्हणून संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार आजपासून मंत्रालयासमोर उपोषणाला सर्व शिक्षक संघटना बसणार आहेत. व त्यानंतर सुद्धा प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास तपासलेल्या उत्तर पत्रिका व मार्कशीट बोर्डात जमा न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच असेल असे संघटनेतर्फे शासनास कळविण्यात आले आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More