कतार स्पर्धेत जोकोव्हिचला पराभवाचा धक्का – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

कतार स्पर्धेत जोकोव्हिचला पराभवाचा धक्का

दोहा – जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचला कतार आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या रॉर्बोटो अ‍ॅग्युटने जोकोला 3 सेटमध्ये 3-6, 7-6, 6-4 असे नमवले. पहिल्या सेट गमावून देखील अ‍ॅग्युटने पुढचे 2 सेट जिंकून सामन्यात बाजी मारली. जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅग्युटने केवळ दुसर्‍यांदा जोकोला नमवण्याचा पराक्रम केला. उभय खेळाडूत झालेल्या आतापर्यंतच्या 9 पैकी केवळ दोनच लढतीत अ‍ॅग्युटेला विजय मिळवता आला आहे. अडीच तासाच अ‍ॅग्युटने जोकोला नमवले. या स्पर्धेत जोकोला संघर्ष करावा लागला होता. पहिल्या दोन सामन्यात देखील पहिले सेट गमावून जोकोने नंतर विजय मिळवला होता. पण अ‍ॅग्युटविरुद्धच्या लढतीत मात्र जोकोला मात्र पुनरावृत्ती करता आली नाही. गतवर्षी विम्बल्डन आणि अमेरकिन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकणारा जोको आता ऑस्ट्रेलियन स्पर्धेत भाग घेण्यासाठी मेलबर्नला रवाना झाला आहे. अंतिम फेरीत आता अ‍ॅग्युटचा मुकाबला स्पेनच्या थॉमस बर्डिचशी होणार आहे. चौथे मानांकन देण्यात आलेल्या थॉमसने इटालीच्या मार्कोला मात्र सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. अ‍ॅग्युटने जोकोवर मिळवलेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्तकरून आपण आता स्पर्धा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करू असे त्याने सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More