कचर्‍याचे प्रमाण कमी झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा – eNavakal
News मुंबई

कचर्‍याचे प्रमाण कमी झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा

मुंबई- मुंबईतील कचर्‍याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पुन्हा एकदा महापालिका प्रशासनानं केलाय. मागील एक वर्षांत 1 हजार 757 गाड्यांच्या फेर्‍यात घट झाल्याची आकडेवारी सादर करत प्रशासनानं कचर्‍याचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केलाय. सध्या महापालिकेच्यावतीनं नियुक्त करण्यात आलेलं जुनेच कंत्राटदार असून या कंत्राटदारांवरच कचर्‍यात डेब्रीज भेसळ केल्याचा आरोप केला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरच गाड्यांच्या फेर्‍यात लक्षणीय घट दिसून येऊ लागली आहे. कचर्‍यामुळे ही घट झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात डेब्रीज भेसळला लगाम बसल्यामुळे तसेच कंत्राटदारांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे ही घटना दिसून येत असल्याचं बोललं जातं. परंतु प्रशासन कचर्‍याचं प्रमाण कमी झाल्याचं सांगत आपली पाठ थोपटवून घेत आहे. मुंबईतील कचर्‍याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीनं सातत्यानं प्रयत्न केला जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More