औरंगाबाद येथे जाणाऱ्या बैलाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक – eNavakal
गुन्हे देश

औरंगाबाद येथे जाणाऱ्या बैलाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

मध्य प्रदेश – काही दिवसांपूर्वी पंधाना रोडवर ५४ बैलांनी भरलेली ट्रक सोडून फरार झालेले दोन आरोपींना राजगड आणि ब्यावरा येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात दाखल केले असता त्यांना दोन दिवसाच्या पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे.

चौकशीमध्ये  मिळालेल्या माहितीप्रमाणे शिवपुरीच्या जंगलातून आरोपींनी हे  प्राणी ट्रकमध्ये भरले असून हे प्राणी त्यांना औरंगाबादला पोचवायचे होते. दरम्यान या तस्कराचा ट्रक मालिक मुख्य आरोपीला शोधण्यासाठी पुलिस पथक औरंगाबाद येथे दाखल झाले.  30 जनवरीच्या दुपारी पंधाना रोडवर पेट्रोल पंपच्या समोर ट्रक क्रमांक (एमपी-09 एचएच- 4786) रस्त्याच्या डिवाइडरला धडकले होते. धडक झाल्यानंतर हेल्पर आणि ट्रक सोडून घटना स्थळावरून तात्काळ पळ काढला. यात फरार आरोपी चालक मुन्ना पिता गफ्फार (22) रेवागंज जिल्हा राजगढ़ व सिद्दीक, वडील करीम खान (21) काचीखेड़ी जिल्हा ब्यावरा यांना पुलिसने मंगलवारी अटक करून आणले आहे. यात आरोपींनी पोलिसांना सांगितल्या प्रमाणे त्यांना इमरान सैयद राहणार औरंगाबाद याने ट्रक देऊन शिवपुरी बैल घेण्यासाठी पोहचले होते. याच ट्रकला दोन राज्यांची नंबर प्लेट लावण्यात आली होती ज्यामुळे त्यांना कोणहि पकडू शकणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गडचिरोलीत चकमक; २ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली – गडचिरोलीतील ग्यारापत्ती गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नरकसा जंगल परिसरात सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान...
Read More
post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More