औरंगाबाद कचरा प्रश्नी एका नागरिकाने कचऱ्याचा ढीग जाळला – eNavakal
अन्य महाराष्ट्र होम

औरंगाबाद कचरा प्रश्नी एका नागरिकाने कचऱ्याचा ढीग जाळला

औरंगाबाद – औरंगाबाद येथील कचरा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होत आहे. सध्या १९ व्या दिवशी कांचनगाव येथील कचर्याच्या ढिगाला एका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने मोठ्या प्रमाणात त्याभागात कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. ह्याआगीमुळे जवळ असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुराचा थर जमा झाला असून रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तर तेथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना देखील श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सध्याचा हा कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात पेट घेत आहे. तर आज ह्याच कचरा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. तर काल देखील ह्याकचरा प्रश्नाची सुनावणी  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली होती, त्यावेळेस सरकारतर्फे शपथपत्र मांडण्यात आले होते. तर आज महापालिकेतर्फे शपथ पत्र मांडण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रस्ते, फूटपाथ खड्डेमुक्त केले जातील महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई -शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि...
Read More
post-image
देश

दुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले

दिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More