औरंगाबादमध्ये शनिवारी काँग्रेसची दुष्काळीबाबत आढावा बैठक – eNavakal
News मुंबई

औरंगाबादमध्ये शनिवारी काँग्रेसची दुष्काळीबाबत आढावा बैठक

मुंबई- मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने शनिवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथील (गारखेडा ) राधाकृष्ण मंगल कार्यालयात बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यांमधील नेत्यांकडून दुष्काळी परिस्थितीची माहिती घेऊन त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली जाईल. यापूर्वी शेतकर्‍यांवर आलेल्या विविध संकटांच्या वेळी भाजप-शिवसेना सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचाही यावेळी आढावा घेतला जाणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक! दोन सराव सामने

मुंबई – आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या 30 मे पासून सुरू होणार असून या स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More