औरंगाबादमध्ये बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या – eNavakal
News आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

औरंगाबाद – अजंता सहकारी बँकेच्या उस्मापुरा शाखाचे व्यवस्थापकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची आज सकाळी घटना उघडकीस आली. या घटनेनंतर औरंगाबाद शहरात खळबळ उडाली. धर्मेंद्र पुराणिक (45) असे आत्महत्या करणार्‍या व्यवस्थापकाचे नाव असून धर्मेंद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

पुराणिक हे समर्थ नगरमधील अर्चना अपार्टमेंटमध्ये राहात होते. त्यांनी आत्महत्या का केली?, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यांनी आत्महत्या केली तेव्हा ते घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा शाळेत गेला होता, तर पत्नी ड्रायव्हिंग स्कूलला गेली होती. घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी चव्हाण, विशेष पोलीस अधिकारी सुधीर जाधव यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पुराणिक यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More