ओशोंच्या मृत्यू पत्राची मुळ प्रत उपलब्ध नाही – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

ओशोंच्या मृत्यू पत्राची मुळ प्रत उपलब्ध नाही

मुंबई- आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची भारतात असलेली प्रत ही बनावट असल्याचा अहवाल दिल्ली फॉरेंसिक लॅबने दिला आहे. तर ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळपत्र जगात कुठेही उपलब्ध नसल्याचा दावा पुणे पोलिसांच्या ईओडब्ल्यूने हायकोर्टात केला आहे.

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी ओशोंची बनावट सही करून ट्रस्टचा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या मालकीच्या खासगी कंपन्यांच्या खात्यात वळवला, असा आरोप करत योगेश ठक्कर यांनी याचिका दाखल केली आहे़ त्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणी न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी पुणे पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेने तपासाचा अहवाल सादर केला. ओशोच्या मृत्यूपत्राची मूळ पत्र जगात कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे निव्वळ झेरॉक्स कॉपीवरून ओशो रजनीश यांची सही खरी की खोटी याची पडताळणी करणं कठीण असल्याचं माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त करून एखाद्या खासगी कंपनीत देतात तसा वार्षिक अहवाल सादर करू नका. या शब्दांत तपास अधिकार्‍यांची कानउघडणी करून दिल्ली फॉरेन्सिक लॅबच्या अहवालावर भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More
post-image
News महाराष्ट्र

प्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालयात

महाड- शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना रक्तदाब कमी झाल्याचा त्रास झाल्याने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळच्या सुमारास...
Read More