ओशिवरा बस डेपोत तब्बल पावणे दोन लाखांची चोरी – eNavakal
मुंबई

ओशिवरा बस डेपोत तब्बल पावणे दोन लाखांची चोरी

मुंबई- गोरेगाव पश्‍चिम येथील ओशिवरा बस डेपोत तब्बल 1 लाख 73 हजार 615 रुपयांच्या मोडमालाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उत्तम किसन ढगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात भादंवि 379 कलमांन्वये  गोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम ढगे हे साकीनाका येथील संघर्ष नगर बिल्डिंग 9 च्या बाजुला चांदिवली गाव येथे राहतात. गेल्या 25 वर्षापासून ते बेस्टमध्ये कार्यरत आहेत. सामग्री व्यवस्थापन अधिकारी म्हणूनतवत्यांनी 2017 ला कार्यभार सांभाळला असून 5 ऑक्टोबर 2018 पासून ते बेस्टच्या ओशिवरा मोडमाल आवारात कार्यरत आहेत. ढगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ओशिवरा आवारात बेस्ट बसेसचे सर्व प्रकारचे मोडमाल (स्क्रॅप) साहित्य असते. याआधी 26 नोव्हेंबर 2016 रोजी येथील सर्व बॅटरीज चेक करून स्क्रॅप बॅटरीज विकल्या होत्या. त्यानंतर जसे स्क्रॅप बॅटरीज निघतील त्याप्रमाणे त्या जमा होत होत्या. त्याची नोंद नोंदवहीत केली जात असे. 24 ऑक्टोबर 2018 रोजी बेस्ट बसेसच्या स्क्रॅप बॅटर्‍यांपैकी 2 बॅटर्‍या ह्या नेहमीच्या जागेवर पडलेल्या दिसल्या. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी या बॅटर्‍यांची ढगे यांनी तपासणी केली. मात्र त्यावेळी 6 व्होल्ट बॅटरीचे 64 हजार 260 रुपयांचे 51 नग, 12 व्होल्ट बॅटरीचे 94 हजार 705 रुपयांचे 47 नग आणि युपीएस बॅटरीचे 14 हजार 650 रुपयांचे 10 नग चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचेच ढगे यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ढगे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात भादंवि 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गोरेगाव पोलिस उपनिरीक्षक अनिल तोंडे करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More