ओला-उबेर भाडे निश्चिती खटुआच्या अहवालानंतर निर्णय का नाही! हायकोर्ट – eNavakal
News न्यायालय

ओला-उबेर भाडे निश्चिती खटुआच्या अहवालानंतर निर्णय का नाही! हायकोर्ट

मुंबई- ओला-उबेर भाडेवाढीसंदर्भात स्थापन केलेल्या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गेल्या वर्षभरात निर्णय का घेण्यात आला नाही?, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला चांगलेच फटकारले. न्या. बी.पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने आठ आठवड्यांत भाडे निश्चितीबाबत निर्णय घ्या, असे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत.
राज्य सरकारकडून अंमलात आणल्या गेलेल्या महाराष्ट्र शहर टॅक्सी नियमावलीला अली रझ्झाक हुसैन आणि इतर पाच अ‍ॅपवर आधारीत टॅक्सी चालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. बी.पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. ओला-उबेर भाडेवाढ संदर्भात राज्य सरकारने निवृत्त सनदी अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची एक समिती तयार केली. या समितीने नोव्हेंबर 2017 मध्ये अहवाल सादर केला. मात्र गेल्या वर्षभरात राज्य सरकारने भाडेेवाढी संदर्भात कोणताच निर्णय घेेतला नाही याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने याची दखल घेऊन राज्य सरकारला आठ आठवड्यांत भाडेनिश्चिती संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
महाराष्ट्र

धक्कादायक! नागपुरात ९ डॉक्टर क्वारंटाईन

नागपूर – नागपुरात ९ डॉक्टरांना क्वारंटाईन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे डॉक्टर ज्या रुग्णावर उपचार करत होते त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शाळा सुरू होत नाही तोपर्यंत फी भरू नका – शिक्षणमंत्री

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक शाळा-महाविद्यालयांकडून पालकांकडे फीची मागणी होत आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

ठाणे भाजी मार्केट हलवणार

ठाणे – भाजीपाला, अन्नधान्याची दुकाने २४ तास सुरू राहतील अशा सूचना सरकारने वारंवार देऊनही अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता...
Read More
post-image
मुंबई

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच संशयित, परिसर सील

मुंबई – देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित आढळले...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘हळद’ म्हणजे सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये पहिल्यांदा हळद घालतो. हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ...
Read More