ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी – eNavakal
मनोरंजन

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – कोरोना संसर्गाचा चित्रपटसृष्टीला अतोनात फटका बसला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने तयार चित्रपटही पडून आहेत. त्यामुळे ओटीटी माध्यमाद्वारे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही शासनाचे अनुदान मिळण्याची मागणी “प्लॅनेट मराठी”चे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अक्षय बर्दापूरकर यांनी पुढाकार घेऊन “प्लॅनेट मराठी ओटीटी” या स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची अनुदान योजना आहे. मात्र या अनुदान योजनेत चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याची अट आहे. कोरोना संसर्गाच्या काळात चित्रपटगृह बंद ठेवण्यात आल्याने चित्रपट प्रदर्शित करता आलेले नाही. निर्मात्यांनी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित केल्यास त्यांना शासनाच्या अनुदान योजनेला मुकावे लागेल. त्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन खास बाब म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही अनुदान योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी बर्दापूरकर यांनी केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – कोरोना संसर्गाचा चित्रपटसृष्टीला अतोनात फटका बसला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने तयार चित्रपटही पडून आहेत. त्यामुळे ओटीटी माध्यमाद्वारे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही शासनाचे अनुदान...
Read More
post-image
देश

एक रुपयाचा दंड ठोठावताच प्रशांत भूषण यांचा ‘तो’ फोटो व्हायरल

नवी दिल्ली -न्यायालय आणि सरन्यायाधीश यांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षा सूनावताच प्रशांत भूषण यांनी सोशल मीडियावर...
Read More
post-image
देश

मंगळवारी 22 मीटर लांब उल्का पृथ्वी जवळून जाणार, नासाची माहिती

नवी दिल्ली- गेल्या महिन्यात एक उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक 22 मीटर लांब उल्का मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

संयुक्त अरब अमिराती दूतावासाच्या प्रभारी प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई – संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबई येथील दूतावासाचे प्रभारी प्रमुख सौद अब्देलअझीझ अलझरुनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा होणार? उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकार परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी करत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा...
Read More