ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेल्या कारचा अपहार करुन विक्री! सराईत गुन्हेगाराला अटक – eNavakal
News मुंबई

ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेल्या कारचा अपहार करुन विक्री! सराईत गुन्हेगाराला अटक

मुंबई-  ओलएलक्सवर विक्रीसाठी ठेवलेल्या कारचा अपहार करुन या कारची नंतर विक्री करुन फसवणुक करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद अय्याज अब्दुल अजीत सैय्यद असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
कार अपहार करुन फसवणुक करणार्‍या टोळीचे काही गुन्हेगार पवई परिसरात येणार असल्याची माहिती एपीआय सुनिल माने यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल बाजारे यांच्या पथकातील मयेकर, सुनिल माने, साळुंखे, भोसले, नंदकुमार पवार, अशोक सावंत, सुनिल कांगणे, विनोद पदमन, आनंदा गेंगे, संतोष ओटे, संदीप पाटील, किरण जगदाळे यांनी पवई परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद अय्याज याला अटक केली.
पोलीस तपासात मोहम्मद अय्याज हा ओएलएक्सवर कार विक्रीसाठी जाहिरात देणार्‍या व्यक्तींना संपर्क साधून त्यांच्याकडून आपण कार खरेदी इच्छुक असल्याचे सांगत होता. त्यानंतर त्यांना कारच्या रक्कमेचा धनादेश देऊन त्यांच्याकडून कारसहीत कारचे कागदपत्रे घेऊन पळून जात होता. याच कारची नंतर तो विक्री करीत होता. गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध सहा गुन्ह्यांची नोंद झाली होती. या सहाही गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर येताच त्याने गोरेगाव, ओशिवरा, एमआयडीसी, बांगुरनगर, उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे काही गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More