ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्याचा एचडीफसीचा प्रयत्न – eNavakal
महाराष्ट्र

ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्याचा एचडीफसीचा प्रयत्न

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक एचडीएफसीने ऑनलाईन व्यवहारांवरील ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द केला आहे. तर चेकद्वारे होणाऱ्या विविध व्यवहारांवर चार्ज वाढवण्याची घोषणा एचडीएफसीने केली आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला.

सॅलरी आणि बचत खातेधारकांना आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून चार्ज लागणार नाही, असं बँकेने म्हटलं आहे. ग्राहकांना सध्या आरटीजीएसद्वारे अडीच लाखांपर्यंत व्यवहार करण्यासाठी 25 रुपये आणि पाच लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी 50 रुपये चार्ज लागतो.

एनईएफटीद्वारे 10 हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहारावर 2.5 रुपये, दहा हजार ते एक लाख रुपयांवर 5 रुपये आणि 1 ते 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी 15 रुपये चार्ज लागतो. तर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहारावर 25 रुपये चार्ज आकारला जातो.

बँकेतून आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहार केल्यास त्यावर चार्ज आकारला जाईल. ग्राहकांना दर वर्षाला 25 पानांचं चेकबुक मोफत मिळेल. मात्र अतिरिक्त चेकबुकसाठी 75 रुपये मोजावे लागतील. खात्यात पैसे नसल्यामुळे चेक बाउन्स झाल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. चेक पेमेंट न होताच परतला तर त्यावरील शुल्क 100 रुपयांवरुन वाढवून 200 रुपये केलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More