ऑनलाईन फसवणुक! नायजेरीयन पती-पत्नीसह रिक्षाचालकाला अटक – eNavakal
News गुन्हे मुंबई

ऑनलाईन फसवणुक! नायजेरीयन पती-पत्नीसह रिक्षाचालकाला अटक

मुंबई- सुमारे 74 लाख रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी तिघांना शुक्रवारी सायबर सेल पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्यात एका नायजेरीयन पती-पत्नीसह नवी मुंबईच्या रिक्षाचालकाचा समावेश असून अटकेनंतर या तिघांनाही येथील लोकल कोर्टाने 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आमरा ओबेसोग्यु, ख्रिस्ताबेल लिबेह आणि अशोक बोराडे अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहीम परिसरात 57 वर्षांची तक्रारदार महिला राहते. दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यांत तिची डॉनल्ड टाँड या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तो अमेरिकन नागरिक असून मरिन इंजिनिअर असल्याची बतावणी केली होती. डिसेंबर 2017 ते 28 मे 2018 या कालावधीत ते दोघेही मेल, फेसबुक, मोबाईल आणि व्हॉटअपच्या माध्यमातून एकमेकांच्या परिचित होते. या दरम्यान त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. तो काम करीत असलेल्या जहाजातील सोने, चांदी आणि विदेशी चलन असलेले पार्सल भारतीय कस्टम विभागाकडून सोडविण्यासाठी तसेच तिला वीस हजार पाऊंड देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून 74 लाख 20 हजार 150 रुपये घेतले होते, ही रक्कम त्यांनी डॉनल्ट याच्या सांगण्यावरुन विविध बँक खात्यात जमा केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोने-चांदी आणि पैशांचे पार्सल तसेच वीस हजार पाऊंड तिच्या घरी पाठविले नव्हते. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी 419, 420, 34 भादवी सहकलम 66 (क), 66 (ड) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर सायबर सेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांना ही रक्कम तीस बॅक खात्यात जमा झाली होती. फसवणुकीच्या उद्देशानेच संबंधित बँक खाती उघडण्यात आली होती, तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना नवी मुंबईतील न्हावाशेवा, उलवे परिसरातील काही रिक्षा आणि टॅक्सीचालक नायजेरीयन टोळीच्या संपर्कात असल्याचे समजले होते. या टोळीच्या मदतीने संबंधित फसवणुकीचा गुन्हा झाल्याचे तपासात निष्पन्न होताच पोलिसांनी अशोक बारोडे या रिक्षाचालकाला अटक केली होती. त्याच्या चौकशीत आमरा आणि ख्रिस्ताबेल या पती-पत्नीची नावे समोर आली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तपासात अशा प्रकारे फसवणुक करणारी ही रेकॉर्डवरील टोळी असून या टोळीविरुद्ध पुणे शहरात अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांनी अशोकची याकामी मदत घेऊन त्याला काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी तेरा मोबाईल, एक मोडेम, एक राऊटर, एक डेटा कार्ड, एक लॅपटॉप, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही शनिवारी दुपारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More