ऐरोली येथील नाट्यगृहाचे डबके बनतेय ‘सुसाईड पॉईंट’ – eNavakal
News मुंबई

ऐरोली येथील नाट्यगृहाचे डबके बनतेय ‘सुसाईड पॉईंट’

नवी मुंबई -ऐरोली सेक्टर ४ येथे मागील काही वर्षांपासून नाट्यगृहाचे काम सुरु आहे येथील डबक्यामध्ये एका महिलेने तिच्या ५ वर्षाच्या लहान मुलासोबत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडली आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेने ऐरोली येथे नाट्यगृहासाठी मंजुरी दिली होती.  नाट्यगृहाकरिता काम सुरु होते, काही कारणास्तव हे काम बंद करण्यात आले. त्यामुळे तेथे एक पाण्याचे मोठे डबके तयार झाले आहे. येथील नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कित्येक नागरिकांनी पालिकेत तक्रार सुद्धा नोंदविली आहे. परंतु पालिकेने याकडे नेहमीच काना डोळा केला. आज या डबक्याचे सुसाईड  पाँईंट झाले आहे. याच डबक्या मध्ये सेक्टर ४ येथील शोभा वाळिंबे वय वर्षे ३२, या महिलेने आपल्या ५ वर्षाच्या लहान (अर्जुन) मुलाला कंबरेला बांधून आत्महत्या केली असून दोघांनाही आपला प्राण गमवावा लागला आहे.
त्यांच्या घरी सासू सासरे एक मुलगी असा परिवार आहे. मयत शोभा वाळिंबे हे मागील २-४ महिन्यांपासून टीबी आजरामुळे त्रस्त होत्या. त्यांचे पती यांनी सुद्धा २ वर्षांपूर्वी आजारपणाला कंटाळून फाशी लावून आत्महत्या केली होती. गेल्या २ दिवसापूर्वी शोभा वाळिंबे यांची तिच्या घरातल्यांनी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये हरविल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी कोणीतरी येऊन त्यांच्या सुनेने पाण्यात आत्महत्या केल्याचे सांगितल्यावर त्यांचा घरातल्यांना कळले. याबाबत अजून तपास सुरु असल्याचे  रबाळे पोलीस ठाणे कडून सांगण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

आसाममध्ये भूकंपाच्या धक्क्याने घबराट

गुवाहटी – मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत अडकलेल्या आसाममध्ये आज दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २.५१ वाजता झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी होती....
Read More
post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More