एसीच्या कुलिंगवर लागणार लगाम – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

एसीच्या कुलिंगवर लागणार लगाम

नवी दिल्ली – एसीच्या तापमानावर आता लगाम लागणार आहे. कारण ऊर्जा मंत्रालयाने एसीचे शेवटचे तापमान म्हणजेच एसीचा सामान्य स्तर २४ डिग्री सेल्सियस करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारने असे आदेश दिले आहेत. देशातील अनेक हॉटेल, विमानतळ, शॉपिंग मॉलमध्ये पहिले ४ महिने प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. याविषयी घेण्यात आलेल्या बैठकीत ग्राहक एसी खरेदी करण्यास आल्यावर एसी विक्रेत्यांनी ग्राहकांशी संवाद साधून त्यांना पैशांची बचत आणि सुदृढ स्वास्थ्याविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.

गर्मीपासून त्रस्त होऊन जास्तीत जास्त गारवा मिळविण्यासाठी अनेक घरांमध्ये एसी वापरला जातो. एसीमुळे देशात विजेचा खपही जलद होत आहे. परंतु घरात, ऑफिसमध्ये एसीचे आदर्श तापमान किती असावे, याची माहिती फारच कमी लोकांना असते. त्यामुळे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येणाऱ्या काळात एसीचे शेवटचे तापमान, सामान्य स्तर २४ डीग्री सेल्सियस इतके असणार आहे. असे केल्यास देशात जवळजवळ वार्षिक २० अब्ज युनिट वीजबचत होऊ शकते. तसेच लोकांची शारीरिक स्थितीही यामुळे सुदृढ राहण्यास मदत होईल.

शरीराचे सामान्य तापमान ३६ ते ३७ डिग्री सेल्सियस असते व एसीचे तापमान १८ ते २१ डिग्री सेल्सियस ठेवल्यास शारीरिक त्रास होतो. त्यामुळे ही उर्जेचा अपव्यय आहे. हीच बाब लक्षात घेऊन जपानमध्येही एसीचे तापमान २८ डिग्री सेल्सियस ठेवण्यासाठी नियम बनविण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More