एसबीआय,आयसीआयसीआय सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका – eNavakal
News देश

एसबीआय,आयसीआयसीआय सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका

नवी दिल्ली – डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. तर, अनेकदा यामुळे गैरव्यवहार झाल्याचे प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, अँड्रॉईड युजर्सला अलर्ट करण्यात आले आहे. जर तुम्हीही अँड्रॉईड युजर आहात आणि बँकेचे व्यवहार करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करता तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. ही बातमी वाचून तुम्ही येत्या काळात तुमच्या बँक खात्याच्या माध्यमातून होणारे पैशांचे नुकसान टाळू शकता. जर तुमचे अकाऊंट SBI, ICICI किंवा HDFC बँकेत आहे आणि तुम्ही संबंधित बँकेचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे तर तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे.
*मोबाईल अॅप वापरताना अश्याप्रकारे काळजी घ्या-
या बँकांचे मोबाईल अॅप वापरताना काळजी घ्या अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. ग्लोबल आयटी सिक्युरिटी कंपनी क्विक हिल सिक्युरिटी लॅबने एक अँड्रॉईड बँकिंग ट्रोजन व्हायरसबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती देखील चोरी होऊ शकते. या खरतनाक ट्रोजनने २३२हून अधिक बँकिंग अँड फायनान्स अॅपला टार्गेट केलं आहे. याचं नाव अँड्रॉईड.बँक.ए९४८० (Android.banker.A9480) आहे. हा व्हायरस तुमची गुप्त माहिती चोरी करण्यासाठी एसएमएस आणि फेक नोटिफिकेशनचा वापर करत आहे. हा व्हायरस तुमचं इंटरनेट बँकिंग लॉगइन आयडी आणि पासवर्डची माहिती चोरी करु शकते.  रिपोर्टनुसार, फेक फ्लॅश प्लेअर अॅपच्या माध्यमातून तुम्हाला नुकसान पोहचवू शकते. या व्हायरसने HDFC, ICICI, IDBI, SBI आणि अॅक्सिस बँकेसोबतच इतरही बँकेच्या अॅपला टार्गेट केले आहे. रिपोर्टमध्ये १२ मोठ्या बँकेंचे अॅप असल्याचं म्हटले आहे. बँकिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सला टार्गेट केल्यानंतर हा व्हायरस ट्रोजनच्या माध्यमातून फेक नोटिफिकेशन लॉगिन आणि पासवर्ड इंटर करण्याचे निर्देश देतं. याच्या माध्यमातून हॅकर तुमच्या लॉगइनच्या संबंधित माहिती सहज चोरी करु शकतात. यामुळे युजर्सला सल्ला देण्यात येत आहे की, थर्ट पार्टी अॅप, एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून येणाऱ्या कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नका.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल होऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र मराठा आरक्षण हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई विदेश

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागे टाकले

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी 4 नव्या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे – पुण्यात रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पुणे महानगरपालिका, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी या सर्व क्षेत्रात कोरोनाला आळा...
Read More
post-image
विदेश शिक्षण

अमेरिकेत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हाकलणार!

वॉशिंग्टन – यापूर्वी अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांचा ‘एच 1 बी’ व्हिसा रद्द केल्यानंतर अमेरिकेने आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. अमेरिकेत...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात सुस्ती

मुंबई – मुंबई शेअर बाजारात आज सकाळी सुस्तीचे वातावरण होते. तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये आजही कमजोरी असल्यामुळे आणि स्मॉलकॅप व मिडकॅपच्या शेअरमध्ये...
Read More