एसटी कर्मचार्‍यांचे पगार एवढे वाढलेत की ते वेडे झालेत! – रावते – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र राजकीय

एसटी कर्मचार्‍यांचे पगार एवढे वाढलेत की ते वेडे झालेत! – रावते

औरंगाबाद – परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या बेताल वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचार्‍यांमध्ये संताप उफाळून आला आहे. एसटी कर्मचार्‍यांचे पगार एवढे वाढले आहेत की, ते आता वेडे झाले आहेत, असे जाहीर वक्तव्य रावतेंनी केले आहे. एसटी कर्मचार्‍यांची ज्यांच्या खांद्यावर भीस्त आहे त्याच मंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
औरंगाबाद येथे आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांना एसटी कर्मचार्‍यांच्या समस्या व पगार वाढीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संतापलेल्या रावते यांनी एसटी कर्मचार्‍यांचे पगार एवढे वाढले आहेत की, ते आता वेडे झाले आहेत, अशी प्रतिक्रिया देत मी हे अधिकृत बोलत असल्याचे सांगितले. कर्मचार्‍यांच्या जखमेवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मीठ चोळण्याचे वक्तव्य केल्याने एसटी कर्मचार्‍यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
या पत्रकार परिषदेत दिवाकर रावते यांनी, औरंगाबाद शहरासाठी 125 मिनी बसेस खरेदी करणार असल्याचेही सांगितले. तसेच इंधन दर कमी झाले असले तरी एसटीचे भाडे कमी करणार नाही, असेही रावते म्हणाले. येत्या काळात औरंगाबाद शहरात नवी वाहतूक सेवा डिसेंबर अखेरीस सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More