एसटीनंतर आता ‘शिवशाही’ संपावर – eNavakal
महाराष्ट्र

एसटीनंतर आता ‘शिवशाही’ संपावर

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर आता शिवशाहीच्या खासगी चालकांनी संप पुकारला आहे. १३ जून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारण्यात आला आहे. दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याच्या आरोपावरून एसटी महामंडळातील शिवशाहीच्या चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

शिवशाहीच्या संपामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. श्री कृपा कंपनीच्या महामंडळात एकूण ३६ शिवशाही बस चालविण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेेतन न मिळाल्याचे चालकांनी म्हटले आहे. रत्नागिरीमधून १४ शिवशाही धावतात. रत्नागिरी विभागातील चालकांनी १३ जूनपासून दुपारी १२ नंतर संप पुकारला असल्याने रत्नागिरीमधून मुंबईत येणाऱ्या १० ते १२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या संपामुळे मात्र प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More